Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांनी लिहिले भारतमातेला पत्र
रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतमातेला अनोखी ‘पत्ररूपी’ भेट दिली. व्हॉट्सअॅपच्या युगात पत्र लिहिण्याचा विसर पडला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पोस्ट कार्डावर पत्र लिहिण्यास प्रवृत्त केले. 

‘आईचं पत्र हरवलं’, ‘डाकिया डाक लाया’ यांसारखे खेळ आणि गाणी कालौघात लुप्त होत चालल्याने पत्रलेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा, असा हेतू ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या पत्रलेखन स्पर्धेत साक्षी पंडित प्रथम आली. ऋतुराज मराठे द्वितीय, तर शुभराणी होरंबे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. ओंकार ओक याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

सर्व विजेत्यांना स्वातंत्र्यदिनी झालेल्या समारंभात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व पत्रे महाविद्यालयाच्या फलकावर प्रदर्शित करण्यात आली आणि नंतर देवरुखच्या शहीद जवान स्मारकात (ता. संगमेश्वर) प्रदर्शनासाठी पाठवण्यात आली आहेत. या उपक्रमात अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सायली पिलणकर यांनी या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZOMBR
Similar Posts
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.
‘जातिअंताची विश्लेषक मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली’ रत्नागिरी : ‘भारतीय समाजाच्या जडणघडणीत जाती व्यवस्था ही केंद्रीय स्थानी राहिली असून, दुर्दैवाने ती समाजस्वास्थास मारक ठरली. यासाठी जातीच्या निर्मितीपासून तिचा विकास आणि जातिअंत या विषयाची विश्‍लेषक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली,’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language